सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Saturday, January 28, 2023

२०२३ चा हा पहिला महिना आपल्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. असे असले तरी आपल्या दांपत्य जीवनासाठी हा महिना चढ - उतारांचा आहे. परंतु नात्यातील प्रेम टिकून राहिल्याने आपण समाधानी राहाल. प्रणयी जीवनासाठी हा महिना खूपच चांगला आहे. नात्यातील जवळीक वाढेल. विशेषतः आपली वैचारिक व समज शक्ती विकसित होईल. आपण निर्णय घेऊन काही महत्वाच्या कार्यांच्या परिणामां पर्यंत पोचू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाच्या बाबतीत जागरूक राहावे लागेल. आपली पदोन्नती संभवते. आपण आपली कामे कमीत कमी वेळेत पूर्ण कराल, व त्यामुळे आपल्या वरिष्ठांना आपण खूप कष्ट करत असल्याचे जाणवेल. व्यापार करणाऱ्या व्यक्तींना चढ - उतारांना सामोरे जावे लागू शकते. आपणास आपल्या खर्चात वाढ व प्राप्तीत कपात होत असल्याचे जाणवेल. असे असले तरी सध्या आपणास धीर धरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा महिना विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्रयत्नांच्या फलस्वरूप आपणास चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. आपणास फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना चांगला आहे. आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देऊन एखाद्या व्यायामशाळेत सुद्धा प्रवेश मिळवाल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43