सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Tuesday, October 4, 2022

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाल्याने प्रकृती विषयक कोणताच त्रास होणार नाही. नोकरीत आपले कष्टच आपल्या यशास कारणीभूत ठरतील. आपणास अचानक बढती किंवा लाभ मिळण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत शीघ्र गतीने वृद्धी होईल. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याची संभावना आहे. मानसिक दृष्ट्या आपण तटस्थ राहाल. आपणास प्रत्येक बाबतीत यश मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित केलेल्या प्रयत्नात सुद्धा चांगले फळ मिळून आपला व्यवसाय शीघ्र गतीने प्रगती करेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारा दरम्यान थोडी दरी असल्याचे आपणास जाणवेल. ती दूर करण्यासाठी आपणास परस्पर संवादाचा आश्रय घ्यावा लागेल. ह्या महिन्यात आपल्या व्यस्ततेमुळे संबंधात थोडा दुरावा येऊ शकतो. जोडीदारा समोर आपल्या भावना व्यक्त कराव्यात. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची योग्य संधी मिळेल व आपण चिकाटीने अभ्यास करू शकाल. ह्या महिन्याचा तिसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57