सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Thursday, January 27, 2022

वर्षाचा हा पहिला महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात आपली प्राप्ती झपाट्याने वाढेल व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात वाढ झाली तरी सुद्धा आर्थिक दृष्ट्या आपण उन्नतच असाल. आपण योग्य निर्णय घेतल्याने जीवनात यशाच्या मार्गावर आपली वाटचाल होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांनी ह्या महिन्यात थोडे सावध राहावे. त्यांच्या नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना लाभदायी ठरणारा आहे. त्यांना दूरवरची ठिकाणे किंवा राज्ये तसेच इतर देशांशी केलेल्या कामांत मोठा लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात काही ताण निर्माण होण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा महिना मिश्र फलदायी आहे. संबंधात प्रेम व रोमांस असला तरी सुद्धा एकमेकांचा अहं दुखावला जाऊ शकतो. तो टाळणे हितावह होईल. आपले आरोग्य उत्तम राहील. मात्र, आपणास आहारावर लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आपली रचनात्मकता वाढीस लागेल. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29