सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Tuesday, March 21, 2023

हे वर्ष आपल्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येणारे आहे. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपल्या आत्मविश्वासाचे स्तर उंचावलेले असेल. देवावर आपली श्रद्धा वाढून आपण धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी होऊ लागाल. ह्या वर्षात आपण एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन सुद्धा करू शकता. त्यामुळे समाजात आपली पत वाढून आपणास प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. काही मोठ्या व्यक्तींशी संपर्क होऊन येणाऱ्या काळात आपणास चांगला लाभ होईल. हे वर्ष गुंतवणुकीसाठी आपणास अनुकूल असल्याने गुंतवणुकीतून आपल्याला चांगला परतावा मिळेल. परंतु अल्प कालीन गुंतवणूक करण्या ऐवजी दीर्घ कालीन गुंतवणूक जास्त फलदायी ठरेल. तेव्हा आपण त्यानुसार गुंतवणूक करावी. वर्षाच्या सुरवातीस आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कदाचित आपण आपणास प्रिय असलेल्या व जवळच्या व्यक्तींसह फिरावयास जाल. त्याने आपणास नवीन ऊर्जा मिळेल व जीवनातील सर्व समस्यांवर मात करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. ह्या वर्षी आपणास भरपूर प्रवास करण्याची संधी मिळेल. काही दूरवरचे विशेषतः परदेशातील प्रवास सुद्धा संभवतात. ह्या वर्षी आरोग्याच्या बाबतीत आपण काहीसे कमकुवत राहाल. तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी सुद्धा मोठे स्वरूप धारण करण्याच्या शक्यतेमुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. स्वतःसाठी खरेदी सुद्धा करावी. विशेषतः वर्षाच्या मध्यास आपणास खरेदी करण्याची संधी मिळेल, ज्यात आपणास भरपूर सवलतीत काही महागड्या वस्तू प्राप्त होऊ शकतील. ह्या वर्षी अनेक वर्षां पासून आपल्या मनात घर करून असलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आपणास अतिशय आनंद होईल. वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या भावंडांच्या एखाद्या समस्येने त्रस्त होण्याची शक्यता आहे. परंतु पहिला महिना संपल्यावर हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागेल. कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरल्याने कुटुंबात आनंद पसरेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींकडे आपण आकर्षित व्हाल व ती खरेदी करण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकाल. त्यामुळे आपले आर्थिक स्तर सुद्धा उंचावेल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:43

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:48 to 17:19

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:12:47 to 14:17