मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, December 3, 2022

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत खूप चिंतीत व्हाल. परंतु, आपण चिंतेतून बाहेर पडून हवा पालट करण्यास जावे. आपण रोज प्राणायाम करावा. त्यामुळे आपल्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊ शकेल. मानसिक चिंता कमी होतील. नशिबाची साथ न मिळाल्याने कार्यात थोडा विलंब संभवतो. परंतु, आपण मेहनत करून आपली कामे नक्कीच पूर्ण करू शकाल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. व्यापाऱ्यांना मात्र थोडे सावध राहून व्यापार करावा लागेल. काही लोक आपल्याशी स्पर्धा करू लागतील. आपणास त्यांच्यावर मात करावी लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेचे वागणे विचित्र झाल्याने तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांची एकाग्रता टिकून राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25