मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, March 21, 2023

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव असल्याचे जाणवेल. आपणास आपला क्रोध नियंत्रित ठेवावा लागेल. आपण जर तसे केले नाहीत तर त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होताना दिसून येईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. प्रणयी जीवनासाठी आठवडा रोमँटिक असल्याचे जाणवेल. आपण आपल्या प्रेमिकेशी भरपूर गप्पा मारू शकाल. आपण आपल्या नात्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत आपण एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल. आपण पदोन्नतीकडे डोळे लावून बसला असाल व कदाचित आपणास पदोन्नती मिळेल सुद्धा, परंतु ती इतकी नसेल कि ज्यामुळे आपले समाधान होईल. त्यामुळे आपण नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. जर आपली नोकरी ट्रान्सफरेबल असेल तर आपणास बदली सुद्धा मिळू शकते. आठवड्याच्या सुरवातीस आपण दीर्घ कालीन रजेवर किंवा एखाद्या प्रवासास जाऊ शकता. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून चांगल्या लाभाची अपेक्षा असू शकते. विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययनात खूप चांगली तयारी करावी लागेल. अध्ययनासाठी ते खूप मेहनत घेतील व त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. भोजनात तेलकट व मसालेदार पदार्थ घेणे टाळावे. अन्यथा पोटाशी संबंधित त्रास होण्याची संभावना आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:43

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:48 to 17:19

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:12:47 to 14:17