मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Saturday, January 28, 2023

आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही त्रास होऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन आपल्या वैवाहिक जीवनात चैतन्य निर्माण करू शकतील. प्रेमीजनांना मात्र काहीसा त्रास सहन करावा लागेल. आपल्यात जवळीक वाढली तरी सुद्धा नात्यात काही तणाव वाढण्याची संभावना आहे. नोकरीवर आपली भिस्त असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचे मिळणारे चांगले परिणाम आपणास खुश करतील. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही नातेवाईकांच्या मदतीची अपेक्षा बागळतील. आपण आपल्या सासुरवाडी कडील लोकांच्या मदतीने सुद्धा प्रगती करू शकाल. मात्र, सासुरवाडी कडील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक तक्रारीने आपण त्रासून जाल. एखाद्या गोष्टीने आपण गंभीर व्हाल. ह्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होऊन आपले आरोग्य अधिक बिघडू शकते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचा पहिला दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43