मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कुटुंबावर पूर्ण लक्ष ठेवाल. तसेच आपल्या कार्यात सुद्धा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. ह्यात आपला बहुतांश वेळ गेला तरी आपले समाधानच होईल. आपणास स्थावर खरेदी करण्याची संधी मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच चांगले असेल. आपल्यात रोमँटिक गप्पा रंगून एकमेकांप्रती आकर्षण वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगला आहे. त्यांच्या व्यापाराचा विस्तार शीघ्र गतीने होईल. आपले जे वायफळ खर्च होत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवावे. तसे न केल्यास आर्थिक बोजा वाढण्याची संभावना आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29