मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, September 26, 2022

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण कुटुंबाकडे लक्ष देऊ शकाल. कुटुंबियांच्या गरजा समजून घ्याल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. घर खर्चात वाढ होईल. कामावर सुद्धा पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपणास दोन्ही ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडेल. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. प्रेमीजनांनी ह्या आठवड्यात आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून द्यावी. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापार विस्तारासाठी काही नवीन योजनांची अंमल बजावणी करू शकतील. ह्यातील काही योजना थोड्या दिवसांसाठी थोपवून ठेवाव्या लागतील, तर काही फारच उपयुक्त ठरतील. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण प्रत्येक काम पूर्ण उर्जेसह कराल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31