मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Wednesday, June 7, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. ग्रहांच्या कृपेने आपले दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह फिरावयास जाण्याची योजना आखली जाईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्य आहे. आपणास आपले जुने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे केल्यासच नाते पूर्ववत होऊ शकेल. आठवड्याच्या सुरवातीस आपले काही खर्च होतील. हे खर्च अचानकपणे होणारे असतील. ह्या आठवड्यात आपणास प्राप्ती चांगली होणार आहे. आपली व्यवसायवृद्धी सुद्धा चांगली होईल. आपण पूर्वी जे काही कष्ट केलेत त्याचे सुखद परिणाम ह्या आठवड्यात आपणास मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपले म्हणणे सावधपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणे करून आपल्या वक्तव्याने कोणी दुखावणार नाही. असे असले तरी आपली कामगिरी उत्तम झाल्याने परिस्थिती आपणास अनुकूलच असेल. विद्यार्थ्यांना हळूहळू अभ्यासात रममाण होण्याची संधी मिळेल. ते मन लावून अभ्यास करतील, जे त्यांच्यासाठी उपयुक्त असेल. ह्या आठवड्यात कोणत्याही शारीरिक समस्येची संभावना दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:38 to 14:19

यमगंड:07:34 to 09:15

गुलिक काळ:14:19 to 16:00