मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, June 30, 2022

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. आपल्या खर्चात सुद्धा शीघ्र गतीने वाढ होईल. आपण कधी विचार सुद्धा केला नसेल अशा कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. तसेच काही खर्च हे आपण आपल्या चैनीसाठी सुद्धा कराल. हे खर्च आपले अंदाजपत्र खोटे ठरवू शेल. त्यामुळे आपणास आर्थिक नियोजन करताना खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत आपणास मध्यम प्रकारची फले मिळतील. आपले आरोग्य चांगले राहिले तरी ऋतुमानातील बदलामुळे उदभवणाऱ्या समस्या आपणास व्यथित करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य असेल. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमीजनांना ह्या महिन्यात संबंधातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. गैरसमज पूर्णपणे दूर झाले नाहीत तरी सुद्धा संबंधात नावीन्य निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रतेचा अभाव जाणवेल. आपणास अधिक लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. आपले काम लोकांच्या नजरेत भरेल व त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01