मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, March 23, 2023

हा महिना आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नात्यातील आपुलकी वाढेल. आपण एकमेकांप्रती समजूतदारपणा दाखवून आपले नाते अधिक दृढ कराल. प्रेमीजनांसाठी काही अंशी महिना अनुकूल आहे. आपण एकमेकांच्या चुका माफ करण्याच्या मनस्थितीतून आपल्या नात्यास एक नवीन संधी द्याल. महिन्याची सुरवात काहीशी प्रतिकूल असू शकते. ह्या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे काही कामात अचानकपणे खोळंबा होऊ शकतो. कामात अपयश मिळण्याची शक्यता असून मानहानीस सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सर्व कामे सावध राहून करावीत. हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. हा महिना वडिलांसाठी नाजूक असेल. त्यांची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा त्यांची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांनी व्यवहारात चोख राहावे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तींशी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. त्याने आपलाच फायदा होईल. व्यापाऱ्यांना व्यावसायिक भागीदाराचा किंवा वैवाहिक जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या व तांत्रिक विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. असे असले तरी घरातील वयोवृद्धांची प्रकृती बिघडल्याने काहीशी चिंता वाटण्याची संभावना आहे. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:41

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:48

यमगंड:06:41 to 08:12

गुलिक काळ:09:43 to 11:15