मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Thursday, January 27, 2022

वर्षाचा हा पहिला महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. महिन्याच्या सुरवातीस एखादे आजारपण येण्याची संभावना असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल, तसेच प्राणायामास आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चढ - उतारांचा आहे. आपण खूप कष्ट कराल व त्याचे चांगले परिणाम सुद्धा आपणास मिळतील, परंतु काही ना काही कारणाने आपले समाधान होणार नाही. शांत राहून व धैर्याने काम करणे हितावह होईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपल्या व्यापाराचा विस्तार होऊन आपण अनेक लोकांच्या संपर्कात याल, जे भविष्यात आपल्या उपयोगी पडतील. विवाहितांचे कौटुंबिक जीवन सुखद होईल. संबंधात रोमांस वाढला तरी काही वाद होण्याची सुद्धा संभावना आहे. असे असून सुद्धा संबंधात गोडवा राहीलच. प्रेमीजनांसाठी हा महिना उत्तम आहे. आपण आपल्या प्रियव्यक्ती समोर विवाहाचा प्रस्ताव मांडू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळेल. तसेच स्पर्धेत यशस्वी होण्याची चांगली संधी मिळेल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29