मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Monday, September 26, 2022

अनेक बाबतीत हा महिना चांगला आहे. मात्र, खर्चात हळू हळू वाढ होणार असल्याने आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. असे असले तरी प्राप्ती चांगली होणार असल्याने आपल्या समोर कोणतेही मोठे आर्थिक आव्हान नसेल. प्रकृतीत खूप मोठी सुधारणा झाल्याने आपली बरीच कामे आपण पूर्ण करू शकाल. आपला आत्मविश्वास वाढेल. व त्यामुळे आपण जीवनात नावीन्य अनुभवाल. आपण प्रत्येक काम नवीन उत्साहाने कराल. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहील. कुटुंबीय सुद्धा आपणास मदत करतील. वडीलधाऱ्यांची प्रकृती चांगली राहील. कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना कामाचा आनंद घेता येईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुखद परिणाम देणारा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रेमीजनांनी आपल्या प्रणयी जीवनातील महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगू नये. एखाद्या बाबतीत आपल्या मनात काही शंका असली तरच इतरांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31