मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Tuesday, March 28, 2023

आपल्यासाठी २०२३ हे वर्ष बरेच काही नावीन्याने भरलेले आहे. जानेवारी पासूनच आपले भाग्य फळफळून आपणास नशिबाची साथ मिळू लागेल. आपली प्रलंबित कामे होऊ लागतील. आर्थिक आघाडीवर सुद्धा उन्नती होईल. हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी खूपच चांगले असून कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल, ज्यात कौटुंबिक ऐक्य व जिव्हाळा असल्याचे दिसून येईल. वर्षाच्या सुरवातीस मंगळाचा प्रभाव आपल्या वैवाहिक जीवनावर होण्याची संभावना आहे. खर्चात वाढ होणार असल्याने आपणास प्राप्तीचे ठोस स्रोत शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या वर्षाच्या सुरवातीस आपणास परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आपल्यापैकी काहीजण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार प्रवास करतील. ह्या वर्षाच्या मध्यास बरेच प्रवास करू शकाल. जर आपल्यावर कोर्टात खटला चालू असेल तर ह्या वर्षी त्याचा निकाल येऊ शकतो. असे असले तरी जानेवारी महिन्यात काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने थोडे शांत राहावे लागेल. त्या नंतरच्या दिवसात कोर्ट - कचेरीच्या कामात यश प्राप्ती होण्याचे दृष्टिपथास येत आहे. आपल्याला प्रकृतीच्या बाबतीत मात्र जागरूक राहावे लागेल, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. वर्षाच्या सुरवातीस आपणास मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्यात मित्रांची मदत आपल्या कामी येईल. आपण व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. आपणास आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी विशेष कष्ट करावे लागणार नाहीत. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे ह्या वर्षी सुखद परिणाम प्राप्त होतील. आपला आत्मविश्वास उंचावेल, जो कोणत्याही अवघड परिस्थितीतून आपणास प्रगतीपथावर घेऊन जाईल. आपल्या मोठ्या भावंडांशी संबंध बिघडण्याच्या शक्यतेमुळे आपणास त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. वर्षाच्या सुरवातीस एखाद्याशी भांडण होण्याची संभावना असल्याने कोणाशीही उलट - सुलट बोलण्याचे टाळावे. हे भांडण अनेक दिवस चालेल व त्यामुळे आपणास त्रास होईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपल्या भावंडांचे आपणास सहकार्य मिळेल. त्यामुळे आपली कामे विना अडथळा पूर्णत्वास जातील. मित्रांसह मौज - मजा करू शकाल. आपली स्फूर्ती वाढेल. ह्या वर्षात आपली परिस्थिती खूप चांगली होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:36

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:49 to 17:21

यमगंड:11:12 to 12:44

गुलिक काळ:12:44 to 14:17