मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Sunday, November 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आळस झटकावा. आपणास प्राप्ती चांगली होईल. काहीजण जुनी कामे पुन्हा करण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांनी कामाकडे दुर्लक्ष करू नये. आपले काम मना पासून करावे. व्यापाऱ्यांना आपल्या कामात प्रामाणिक राहावे लागेल. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा सरकार यांना कोणत्याही प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा अडचणीत सापडावे लागेल. आपण आपल्या कामाचा विस्तार दूरवरच्या ठिकाणी करून चांगला नफा कमावू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपले प्रणयी जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. प्रणयी जीवनातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना गंभीरतेने अभ्यास करावा लागेल. आठवड्याचे मधले व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31