मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Thursday, June 30, 2022

हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रणयी जीवनाची काळजी कराल. आपण आपल्या प्रेमिकेस एक अद्भुत भेट वस्तू द्याल, जी तिला खूप आवडेल. आपणास जितकी तिची गरज भासते तितकीच तिला सुद्धा आपली गरज भासत असल्याचे जाणवल्याने आपण आनंदित व्हाल. विवाहितांसाठी हा आठवडा तणावग्रस्त वातावरणातून सुद्धा काही शिकवणारा आहे. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून काही शिकावयास मिळेल, जे आपल्यासाठी खूप उपयुक्त असेल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. आपल्या कार्यक्षमतेवर आपला विश्वास असेल. व्यावसायिकांना ह्या आठवड्यात प्रवासातून काही नवीन कल्पना सुचतील. आपल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01