मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Tuesday, November 29, 2022

ह्या महिन्यात आपणास बरेच काही शिकावयास मिळेल. कामाच्या बाबतीत आपणास खूपच चांगले परिणाम मिळतील. आपणास शासनाकडून सुद्धा मोठा फायदा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एकाहून अधिक कामाची जवाबदारी सोपविण्यात येऊ शकते. आपल्यावर कामाचा भार वाढेल, परंतु आपणास चांगली पगारवाढ सुद्धा मिळेल. त्यामुळे आपण मनापासून प्रसन्न राहाल. आपण सर्वकाही पूर्ण उत्साहाने कराल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात आपल्या कामात वेग आणण्यास व व्यापार वृद्धी करण्यास अनुकूलता लाभेल. त्या प्रमाणे आपणास आपल्या योजना आखाव्या लागतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. आपणास एकटेपणा जाणवेल. आपला वैवाहिक जोडीदार आपले मन ओळखू शकत नसल्याचे आपणास जाणवेल. अशा स्थितीत त्यांच्याशी संवाद साधून आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांना आपले म्हणणे समजू शकेल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. प्रेमात थोडा निरसपणा आला तरी शांत राहिल्यास सर्व काही सुरळीत होऊ शकेल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात चढ - उतार येतील. त्यांना मेहनत करूनच यश प्राप्त होईल. ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:10 to 16:31

यमगंड:11:06 to 12:27

गुलिक काळ:12:27 to 13:49