- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आपल्या बाबतीत एक समज आहे कि आपण फक्त स्वतःच्या बाबतीतच विचार करता व काहीसे स्वार्थी असता. काही अंशी हे खरे सुद्धा आहे, परंतु जेव्हा आपण समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा विचार करता तेव्हा त्यात बरेच काही बदलून टाकता. ह्या वर्षी सुद्धा आपल्या बरोबर असेच काही होणार आहे. आपल्या मनात काही ज्वलंत विषय असतील, ज्यामुळे आपण राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवून त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकता. ह्या वर्षी आपणास प्रवासा संबंधी विशेष विचार करावा लागणार नाही. बहुतांश वेळी आपणास घरा बाहेर राहूनच यश प्राप्ती होऊ शकते. आपण जर घरात राहत असाल तर कदाचित काम करताना सुद्धा इतर प्रवृत्तींमुळे आपणास कुटुंबियां पासून दूर राहावे लागेल. परंतु, ह्यात सुद्धा आपणास फायदाच होईल. वर्षाच्या सुरवातीस परदेश गमनाची संधी मिळेल, तेव्हा प्रयत्न करा व वेळेचा दुरुपयोग टाळा. मनात धार्मिक विचारांची वृद्धी होईल, जी आपणास योग्य मार्गावर घेऊन जाईल व आपल्या हातून कोणतेही चुकीचे कृत्य होऊ देणार नाही. त्यामुळे समाजात सुद्धा आपली पत - प्रतिष्ठा वाढेल व आपल्याकडे आदराने बघितले जाईल. भावंडांच्या बाबतीत आपण जागरूक राहाल व त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एखादे मोठे पाऊल उचलाल. ह्या वर्षी आपणास विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात बहर येण्यासाठी आपणास कष्ट घ्यावेच लागतील. फेब्रुवारी व मार्च दरम्यान आपण एखादी महागडी वस्तू किंवा मोबाइल खरेदी करू शकाल. हि वस्तू अशी असेल कि जी अनेक वर्षां पासून खरेदी करण्याची आपली इच्छा असेल. माता - पित्यांशी काही मतभेद संभवतात, जे टाळण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. आपणास परदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. कुटुंबात एखादे शुभ कार्य, पूजा इत्यादी होण्याची शक्यता आहे. विशेषतः सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान घरात एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रकृतीत चढ - उतार आले तरी कोणतेही मोठे दुखणे येणार नाही. आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी तर उदभवू शकतात. आपल्या मनात भौतिक सुखाची इच्छा तर होईलच, परंतु अनेकदा आपला व्यवहार संन्यासास शोभेल असा असेल. त्यामुळे आपले मन गर्दीत रमणार नाही. तेव्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा, जेणे करून गोष्टी पुढे जाऊन आपले नुकसान होणार नाही. ह्या वर्षी वडिलांशी असलेल्या संबंधात काही तणाव निर्माण होऊ शकतो, तेव्हा काळजी घ्यावी.
राशी व्यक्तिमत्त्व
मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
वर्षभरातनंतर सूर्य मिथुन राशीत! या 4 राशींना पद-प्रतिष्ठा मिळेल, भाग्यही चमकेल
-
वास्तवापासून दूर पळतात या 4 राशी, स्वप्नात गुरफटण्याची असते आवड
-
आयुष्यात पुन्हा-पुन्हा प्रेमात पडतात या राशीचे लोक, ब्रेकअप झाला तरी परत...
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:चित्रा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:वरिय
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:59
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च