मकर   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(मकर राशी)

Monday, January 17, 2022

२०२२ चे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी खुपच चांगले आहे. आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याने अनेक बाबतीत आपण यशस्वी व्हाल याकडे ग्रहमान अंगुली निर्देश करत आहे. आपली प्रकृती उत्तम राहील आपल्या प्राप्तीत वाढ कशी करायची याकडे आपण अधिक लक्ष द्याल. त्यानुसार काम केल्यास आपणास चांगले परिणाम मिळतील. ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना सुद्धा केलेल्या प्रयत्नात यश प्राप्त होण्याची संभावना आहे. कुटुंबातील लहान व्यक्ती आपल्यावर प्रेम करू लागेल व आपल्याशी मिळून मिसळून राहील. त्यामुळे आपल्या मनात सुद्धा त्याच्या बद्धल प्रेम भावना निर्माण होऊन त्याच्यासाठी काहीही करण्यास आपण तयार व्हाल. आपल्या हातून महत्वाची संधी जाऊन आपल्याला पश्चाताप करावा लागू नये, म्हणून आपणास अति आत्मविश्वासा पासून दूर राहावे लागेल. योग्य वेळी योग्य काम करून आपला फायदा होईल. आपणास अनेक बाबतीत कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल, जो त्यांच्या अनुभवावर आधारित असेल. त्यामुळे आपणास सकारात्मक परिणाम मिळेल. वर्षाच्या मध्यास आपल्या प्रकृतीत चढ - उतार येण्याची संभावना असल्याने आपणास आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपणास आजारपण येण्याची संभावना आहे. वर्षाचे अखेरचे चार महिने आपल्यासाठी उत्तम आहेत. आपणास जे काम अनेक दिवसांपासून करावयाचे होते व ज्यात आपला खोळंबा झाला होता ते काम सुद्धा पूर्ण होईल. हे वर्ष आर्थिक दृष्ट्या अत्यंत अनुकूल असून आपल्या योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. अशी संधी वारंवार मिळणार नाही. कायदेशीर बाबीत आपणास यश मिळू शकते.

राशी व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:44 to 10:06

यमगंड:11:27 to 12:49

गुलिक काळ:14:11 to 15:33