कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Monday, February 6, 2023

ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी मध्यम फलदायी असेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात वाढत असलेल्या तणावाचा त्रास होईल. आपणास आपल्या सासुरवाडी कडील लोकांशी सुद्धा बोलणी करावी लागतील. असे केल्यानेच तणाव निवळू शकेल. प्रेमीजनांतील समन्वय उत्तम असेल. ते एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवू शकतील. ते आपल्या प्रेमिकेस फिरावयास सुद्धा घेऊन जाऊ शकतील. आपण उत्साहित होऊन आपली कामे दृढतेने कराल, त्यामुळे आपल्या मनात चांगल्या भावनांचा उदय होईल. असे झाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वरिष्ठांशी आपले संबंध सलोख्याचे राहतील. त्याचा आपणास नोकरीत लाभ सुद्धा होईल. आपणास एखादे नवीन काम देण्यात येऊ शकते. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार वृद्धीसाठी काही नवीन लोकांना भेटावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मेहनत करण्याचा आहे. अभ्यासात प्रगती करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीच्या बाबतीत आपणास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागण्याची संभावना आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41