कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Tuesday, March 21, 2023

ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांच्या जीवनात लहान - सहान समस्या समोर येतील. असे असले तरी परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागेल. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली कामे होतील व आपला आत्मविश्वास वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. आपणास एकमेकांत समन्वय साधण्यात थोडा त्रास होईल. ह्या आठवड्यात आपणास दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. कुटुंबियांसह जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन एकमेकात उत्तम समन्वय साधला जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या नखरेल शैलीने कार्यक्षेत्र व सभोवतालचे वातावरण हलके करतील. त्यामुळे त्यांची कामगिरी सुद्धा उत्तम होईल. व्यापारी आपल्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे व्यापार वृद्धिंगत होईल. विद्यार्थी अभ्यासात मग्न राहतील. काहीजणांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. ह्या आठवड्यात आपला मानसिक ताण सुद्धा वाढू शकतो. आरोग्यास हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपण व्यायाम व योगासन ह्याकडे लक्ष द्यावे. आपल्या भोजनाच्या वेळेत बदल करून त्याची अंमल बजावणी करावी. अन्यथा पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:43

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:48 to 17:19

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:12:47 to 14:17