कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Monday, December 5, 2022

वर्षाचा हा शेवटचा डिसेंबर महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूपच चांगला आहे. ह्या महिन्यात आपणास नशिबाची साथ मिळेल, व त्यामुळे आपली खोळंबलेली कामे पूर्णत्वास जातील. आपणास कमी श्रमात जास्त फायदा मिळू शकेल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होऊ शकेल. प्राप्तीत खूप वाढ होईल. खर्च कमी होतील. आपली विचारसरणी दृढ होईल. आपण आपल्या दूरदृष्टीमुळे जीवनात पुढे जाऊ शकाल, ज्यामुळे आपणास व्यापारात सुद्धा खूप मोठा फायदा होऊ शकेल. कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना बदलीची ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आपणास आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली मिळू शकेल. आपल्या जीवनात नावीन्य येईल. कौटुंबिक जीवन खुशीने भरलेले असेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन ह्या महिन्यात खूपच चांगले असेल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने आपण एखादी सिद्धी प्राप्त करू शकाल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात थोडा तणाव असून सुद्धा प्रेम व रोमांस राहील. आपली प्रियव्यक्ती आपल्यावर खुश होईल व आपणास खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना थोड्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा लक्षपूर्वक अभ्यास करावा. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:47

यमगंड:11:08 to 12:29

गुलिक काळ:13:50 to 15:11