कर्क   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कर्क राशी)

Thursday, June 1, 2023

महिन्याची सुरवात आपल्यासाठी चांगली आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस यांच्या बरोबरीने थोडे वाद सुद्धा होतील, परंतु आपण नाते टिकवून ठेवण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक भागीदाराशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. आपल्यात खूप आत्मविश्वास असेल, जो आपणास प्रगती करण्यास ऊर्जा देईल. परंतु ग्रहस्थिती प्रतिकूल असल्याने आपले एखाद्याशी भांडण सुद्धा होऊ शकते. तेव्हा सावध राहून व विचारपूर्वक कोणाशीही संवाद साधावा, अन्यथा भांडण झाल्याने आपणास मानसिक त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना विचारपूर्वक काम करावे लागेल. आपण खूप मेहेनत करून नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती प्रबळ करण्याचा प्रयत्न कराल. परंतु कामाच्या ठिकाणी आपल्यावर कामाचा इतका ताण असेल कि आपण त्याने त्रासून जाल. ह्या त्रासामुळे काही चुका होऊन त्या आपल्या विरुद्ध जाण्याची संभावना आहे. तेव्हा सतर्कतेने कामे करावीत. व्यापारात डोके शांत ठेवून काम करावे लागेल. घाईघाईत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये, अन्यथा त्रास संभवतो. हा महिना गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. विद्यार्थी आपल्या अध्ययनात काही नवीन विषयांना समाविष्ट करतील. त्यांना एखाद्या तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला असला तरी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56