- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा महिना आपल्यासाठी सुस्थिती घेऊन येत आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम व आकर्षण जाणवेल. असे असून सुद्धा आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारात काहीसा दुरावा निर्माण होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. आपण जर कोणाच्या प्रेमात असाल तर आपण अति अधीर होऊन आपल्या भावना लवकरच आपल्या प्रियव्यक्ती समोर व्यक्त कराल व त्यामुळे आपल्यातील जवळीक वाढेल. असे असून सुद्धा आपण थोडा धीर धरावा. घाई केल्याने आपणास त्रास होऊ शकतो. आपणास आपल्या प्रियव्यक्ती कडून एखादा लाभ होईल. नशिबाच्या प्राबल्याने आपणास आपल्या कामात यश प्राप्त होईल. तीर्थयात्रेची संधी मिळेल. आपल्या मनात चांगले विचार येतील व आपण चांगले निर्णय घेऊन जीवनात यश प्राप्त करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या बुद्धीच्या जोरावर सुस्थिती प्राप्त करतील. असे असले तरी कोणा विरुद्ध कट - कारस्थान करू नये, अन्यथा आपणास त्रास सहन करावा लागू शकतो. आपण जर एखादा व्यापार करत असाल तर हा महिना आपल्यासाठी अनुकूल राहील. सध्याचे ग्रहमान आपल्या बाजूने आहे, तेव्हा कष्ट करून आपणास मोठा लाभ होऊन आपला व्यापार वृद्धिंगत होईल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. अभ्यासात चांगले गुण मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येईल. ह्या महिन्यात आपली प्रकृती चांगली राहील. कोणतीही आरोग्य विषयक समस्या दिसत नसली तरी ऋतुजन्य विकार होण्याची संभावना आहे. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
कर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च