मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Sunday, November 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्याकडे बघून आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याचे कोणालाही समजू शकेल. आपण जर नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार असलात तर ह्या आठवड्यात आपण त्यात यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत आपणास खूप चांगले परिणाम मिळतील. आपण जर खूप मेहनत केलीत तर आपल्या मेहनतीची प्रशंसा केली जाईल. त्याच बरोबर लोकांना आपल्या कामा विषयी जी तक्रार होती ती दूर होईल. आपली बढती संभवते. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या प्राप्तीचा आलेख उंचावलेला बघून आपण आनंदित व्हाल. पूजेसाठी सुद्धा आपण वेळ काढाल. काही मित्रांशी वाद संभवतात. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. दोन्ही कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भेटून आनंदित होतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. त्यांना अभ्यासासाठी जास्तीचा वेळ मिळू शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31