मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, February 2, 2023

हा आठवडा आपल्यासाठी खुशीने भरलेला असेल. घरात एखादे मंगल कार्य होईल. लोकांची ये - जा झाल्याने घरातील वातावरण प्रसन्न होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल, परंतु जोडीदाराची वागणूक आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल. तसेच ती समजण्यास वेळ सुद्धा लागेल. आपला जोडीदार जर आपणास काही करावयास सांगत असेल तर ते करण्यासाठी आपण तत्पर असावे. प्रेमीजनांची स्थिती चांगली असेल. आपल्या नात्यात भरपूर रोमांस असल्याचे दिसेल. सध्या आपल्या प्राप्तीत वाढ होईल. ज्या आर्थिक आव्हानांना आपण सामोरे जात होता त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. जर मानसिक तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न केलात तर जीवनात यशस्वी होऊ शकाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी आपणास आकर्षित करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात त्यांचे लक्ष लागून ते त्यात चांगले यश सुद्धा प्राप्त करू शकतील. आरोग्य उत्तम राहिल्याने आपण आनंदात राहाल. व्यायाम व प्रवास ह्यासाठी भरपूर पैसा व वेळ खर्च कराल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29