मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, March 23, 2023

हा आठवडा आपण व्यस्त राहण्याचा आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील जवळीक वाढल्याने दांपत्य जीवन सुखावह होईल. जोडीदारासह खरेदीस सुद्धा जाऊ शकाल. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपले संबंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील. कामा निमित्त भरपूर धावपळ झाल्याने आपणास खूप थकवा सुद्धा जाणवेल. थकव्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊन आपली प्रकृती बिघडेल. अशा परिस्थितीत आपणास विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा लागेल. प्राप्ती साधारणच होईल, मात्र खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. नोकरीत चांगल्या संबंधांमुळे लाभ होतील. आपली मेहनत कामी येऊन अवघड कामे सुद्धा आपण सहजपणे करण्यात यशस्वी व्हाल, ज्याचे श्रेय सुद्धा आपणास मिळेल. आपणास आपल्या कामाचा अभिमान वाटेल. असे असले तरी आपली वाणी नियंत्रित ठेवावी. वाणीतील कटुता त्रासदायी ठरू शकते. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणतीही समस्या होईल असे दिसत नसले तरी तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचा पहिला, दुसरा, पाचवा व सहावा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:41

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:48

यमगंड:06:41 to 08:12

गुलिक काळ:09:43 to 11:15