मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, December 3, 2022

वर्षाचा हा शेवटचा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या कुटुंबाची थोडी काळजी वाटेल तसेच पैश्यांशी संबंधीत काही बाबी सुद्धा आपल्या चिंतेस कारणीभूत ठरू शकतील. ह्या सर्वातून बाहेर पडून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल केल्यासच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आपले आपल्या खाण्या - पिण्यावर नियंत्रण न राहिल्याने अनावश्यक पदार्थ सुद्धा आपण खात राहाल. काही अनावश्यक प्रवास सुद्धा आपल्या दुर्बल आर्थिक स्थितीसाठी कारणीभूत होऊ शकतात. खर्चात वाढ होईल. प्राप्ती एकदम सामान्य राहील. त्यामुळे जीवन सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांना कामात यश मिळू शकेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी काहीसा नाजूक आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांना ह्या महिन्यात रोमांस करण्याच्या भरपूर संधी मिळतील. आपल्या प्रियव्यक्ती समोर आपल्या मनातील भावना निःसंकोचपणे व्यक्त कराव्यात. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. त्यांना अभ्यासाप्रती अधिक समर्पित व्हावे लागेल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25