मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, June 1, 2023

महिन्याच्या सुरवातीस मानसिक तणावा पासून दूर न राहिल्यास आपणास शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. असे झाल्याने वैवाहिक जीवनात सुद्धा तणाव वाढण्याची संभावना आहे. आपले जोडीदाराशी भांडण होईल असे कोणतेही कृत्य करू नका. ह्या महिन्यात आपल्या नात्यात दुरावा येण्याची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपणास संयमित राहावे लागेल. प्रेमीजन विचारपूर्वक पाऊल उचलून आपल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमिकेची ओळख करून देतील. ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रेमिकेसह रोमँटिक क्षण घालविण्याची संधी मिळेल. अशी स्थिती महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या एकाग्रतेत कमतरता असल्याने ते कामाच्या बाबतीत काळजीत राहतील. व्यापाऱ्यांना खूप मोठा फायदा होईल. ते स्वतःसाठी एखादे नवीन कार्यालय घेऊ शकतील. प्रॉपर्टीशी संबंधित कार्यात लाभ होईल. ह्या महिन्यात प्रकृती नाजूक राहील. मानसिक तणाव व शरीरातील आतील भागास सूज येण्याचा किंवा तो भाग दुखण्याचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना अध्ययनात त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा लागेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56