मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Saturday, January 28, 2023

हा महिना आपल्यासाठी एक नवीन सुरवात घेऊन येत आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात विशेषतः वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या नात्यात तणाव वाढेल. एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येतील. प्रेमीजनांना मात्र अनुकूलता जाणवेल व त्यामुळे ते एकमेकां बरोबर बराच वेळ घालवू शकतील. दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा ठरू शकेल. आपण मानसिक दृष्ट्या काहीसे त्रासलेले असाल, परंतु पहिल्या आठवड्या नंतर आपल्या स्थितीत बराच फरक पडू लागेल. आपणास जमीन - जुमल्याशी संबंधित कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामात लक्ष घातल्यास यश नक्कीच प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात विनाकारण गप्पा गोष्टी करण्यात वेळ व काम दोघांची हानी होईल. व्यावसायिक व्यक्तींना वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार यांच्या कडून चांगला लाभ होऊ शकतो. ह्या महिन्यात धार्मिक कार्यावर सुद्धा बराच खर्च होईल. भाग्य प्रबलतेमुळे आपली कामे होऊ लागतील. आपली भाषा नियंत्रित ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. अभ्यासात चांगली प्रगती होईल. ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43