कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Saturday, January 28, 2023

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव जाणवला तरी वैवाहिक जोडीदारामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रणयी जीवनासाठी हा महिना ठीक आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीसह फिरावयास जाऊ शकाल. ह्या महिन्यात आपल्या प्राप्तीत तेजी दिसून येईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल, मात्र दुसरीकडे खर्चात सुद्धा वाढ होईल. अशा परिस्थितीत आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल व त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपणास पाठिंबा देतील. व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळाल्याने व्यापारात प्रगती करता येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने सध्या आपणास मानसिक तणाव असल्याचे दिसत आहे. हा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. ह्या महिन्याचे सुरवातीचे दिवस व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43