कुंभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(कुंभ राशी)

Thursday, January 27, 2022

कुंभ राशीच्या व्यक्ती धुनी असतात. मनात येईल ते पूर्ण केल्या शिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. स्वतःसाठी एखादा नियम बनवून त्यानुसार वागण्यास प्राधान्य देत असल्याने आपले विचार ते सहसा बदलत नाहीत, परंतु त्यात महत्वाची बाब म्हणजे गुप्तता सुद्धा जास्त असते. त्यांचे मन समजून घेणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही व त्यामुळे अचानक निर्णय घेऊन समोरच्या व्यक्तीस ते हतबल करतात व तीच त्यांची मोठी शक्ती आहे. २०२२ चे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी आहे. ह्या वर्षी आपणास आपल्या दोन बाबींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यात एक म्हणजे आपली प्रकृती, जी अधून मधून आपणास त्रास देऊ शकते, व दुसरी म्हणजे आपले खर्च. ह्या वर्षी आपल्या खर्चात काही ना काही कारणाने खर्च वाढणार असल्याने आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जर खर्च नियंत्रणात राहिले नाहीत तर आपली आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. आपल्यापैकी काहीजणांना परदेशात स्थायी होण्यात यश मिळू शकेल, ज्यामुळे आपली इच्छापूर्ती होऊन आपणास आनंद प्राप्त होईल. ह्या वर्षात आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे. विशेषतः व्यापारीवर्गास. कामाच्या ठिकाणी आपणास सहकाऱ्यांशी नीट वागावे लागेल, जर त्यांच्याशी आपले संबंध बिघडले तर त्याचा आपल्या नोकरीवर परिणाम होण्याची संभावना आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहावे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. आपण जर त्यांना प्रस्ताव दिलात तर ते आपल्या व्यवसायात भागीदारी करू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आपले कष्ट वाढवावे लागतील. आपले कष्ट हेच आपले ह्या वर्षाचे शस्त्र होऊन आपणास मदत करू शकेल. कौटुंबिक जीवन ताण - तणावाचे राहिले तरी वेळोवेळी ते संपुष्टात येतील. ह्या वर्षात आपण आपल्या जुन्या योजनांवर पुढाकार घेऊन काम कराल व त्यात यश प्राप्त कराल. ह्या वर्षात आपण जेथे काम करता तेथे कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी आपणास घ्यावी लागेल, अन्यथा कामावरून आपले लक्ष इतरत्र जाऊन आपल्या हातून चुका होऊ लागतील. ह्या चुका पुढे जाता आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतील. स्वतःवर विश्वास ठेवून काम केल्यास यश आपल्या समोर चालतच येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी शनी असतो. स्वामी ग्रह शनी असल्याने कुंभचे जातक आपले विचार, जीवन आणि गति यात कुणाची ढवळाढवळ खपवून घेत नाहीत. मकर राशीचे लोक बरेचदा महान संशोधक किंवा तांत्रिक विशेषज्ञ असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29