मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Thursday, August 11, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याची सुरवात काहीशी प्रतिकूल होईल. आपण मानसिक तणावाखाली वावराल, त्याच बरोबर अनावश्यक प्रवास करावे लागल्याने आपण व्यथित सुद्धा व्हाल. असे प्रवास टाळणे हितावह होईल. आठवड्याच्या मध्यास आपल्याला नशिबाची साथ मिळाल्याने आपली अनेक कामे पूर्ण होतील. मेहनतीच्या प्रमाणात जास्त फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामावर पकड असल्याचे जाणवेल. त्यांचे मनोबल सुद्धा उंचावेल. लोक आपले म्हणणे ऐकून घेऊन यशाचा मार्ग दाखवतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच आशास्पद आहे. त्यांच्या नफ्यात वाढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. एखाद्या नवीन चिंतेने आपण व्यथित व्हाल. एकमेकांशी संवाद साधून आपण त्याचे निराकरण करू शकाल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना चांगले अनुभव येतील. आपण ह्या आठवड्यात बँकेचे कर्ज फेडून तणावमुक्त जीवन जगण्याकडे वाटचाल करू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06