मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, August 16, 2022

हा महिना आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल. ह्या महिन्यात कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी आपले भांडण संभवते. मग हि व्यक्ती आपली माता असो किंवा पिता. हे भांडण टाळण्याचा प्रयत्न जर आपण केलात तर ते आपल्याच हिताचे होईल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने आपण चिंतीत व्हाल. व त्यामुळे आपण मानसिक तणावा खालीच वावराल. आपल्या खर्चात कपात व प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपण आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अधिक कष्ट करण्यास तयार राहावे लागेल. आपणास एखादे नवीन काम मिळण्याची संभावना असून आपल्या कामाचा भार सुद्धा वाढू शकेल. मात्र, आपला आत्मविश्वास दांडगा असेल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात चांगला फायदा होईल. आपले व्यावसायिक भागीदार अनेक ठिकाणी आपला प्रचार करतील, त्यामुळे आपण आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव राहतील. आपणास स्वतःवर लक्ष केंद्रित करून वागणुकीत सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या मनातील भावना प्रियव्यक्तीस व्यक्त करू शकाल. त्यामुळे आपणास एकमेकांची खरी ओळख होऊन संबंधात माधुर्य निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल व ते अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शूल

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:57 to 17:34

यमगंड:11:06 to 12:43

गुलिक काळ:12:43 to 14:20