मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Tuesday, September 27, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. ह्या महिन्यात आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. आपल्याकडे पैश्यांचा ओघ सतत चालू राहिल्याने पैश्याच्या बाबतीत आपण खूपच नशीबवान ठराल. त्यामुळे जी आर्थिक समस्या आपणास भेडसावत होती ती आता दूर होईल. ह्या महिन्यात कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबियात परस्पर वाद होऊन शत्रुत्वात वाढ होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपणास प्रत्येकाकडे लक्ष द्यावे लागेल. व जर समस्या असलीच तर परस्पर संवाद साधण्याचा मार्ग आपणास पत्करावा लागेल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपण आपले काम व कष्ट करतच राहावे. ह्या महिन्यात प्रेमीजन आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या रमणीय स्थळी फिरावयास जाण्यास प्राधान्य देतील. एकमेकांचा सहवास साधून आपले संबंध दृढ होतील. विवाहितांना हा महिना आत्मचिंतन करण्याचा आहे. आपल्या वैवाहिक जीवनात आपण काय करत आहोत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, व जेथे आपली चूक दिसत असेल तेथे तिचा स्वीकार करून ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. आपल्या व्यवसायास गती येईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी एखादी चांगली बातमी घेऊन येईल. ह्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:30 to 17:01

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 14:00