Home /News /astrology /

वार्षिक राशीभविष्य 2022: एप्रिलनंतर मीन राशीला साडेसाती सुरू; कसं मिळेल फळ?

वार्षिक राशीभविष्य 2022: एप्रिलनंतर मीन राशीला साडेसाती सुरू; कसं मिळेल फळ?

आपण राशीचक्रातली शेवटची रास मीनचं (Pisces Horoscope) भविष्य पाहणार आहोत. मीन राशीला (Rashifal 2022 Meen rashi) कुठला काळ फलदायी ठरणार आणि कुठल्या काळात काळजी घ्यावी लागणार?

राशीभविष्य 2022: प्रत्येक राशीत वर्षभराच्या काळात काही ना काही ग्रहबदल होत असतात.  नवीन वर्षात दररोज एका राशीचं वार्षिक राशीभविष्य (Horoscope New year 2o22) आपण पाहात आहोत. आता ते अंतिम टप्प्यात आलं आहे. पहिल्या 11 राशींनंतर आज आपण राशीचक्रातली शेवटची रास मीनचं (Pisces Horoscope) भविष्य पाहणार आहोत. मीन राशीला (Rashifal 2022 Meen rashi) कुठला काळ फलदायी ठरणार आणि कुठल्या काळात काळजी घ्यावी लागणार? कुठला काळ सुखाचा..वाचा वार्षिक राशीभविष्य...

मीन राशीला नोकरीत उत्तम फळ मिळेल वर्ष 2022 हे शुक्र प्रधान वर्ष आहे. तुमचा राशी स्वामी शुक्र वर्षाचे सुरवातीला दशमात असेल. नोकरीत उत्तम फळे देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. मार्च अखेरीस होणारे ग्रह बदल म्हणजे राहू मेष तर केतू तुला राशीत प्रवेश करणार आहे. राशीच्या धन आणि अष्टम स्थानातील हे भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काही कारणाने  आरोग्य तपासणी करावी लागेल. लग्नाचा योग एप्रिल मध्ये राशीत येणारा गुरू  सर्वार्थाने शुभ फळ देईल. उच्च गुरू स्वभाव धार्मिक आणि प्रगल्भ करेल. लग्नाचे योग येतील. संतती प्राप्तीचे ग्रह स्थिती अनुसार फळ मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. एप्रिलनंतर साडेसाती सुरू एप्रिल नंतर शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. आणि मीन राशीची साडेसाती सुरू होईल. पुढील काही वर्ष तुम्ही शनि च्या न्याय प्रिय स्वभावाचा  अनुभव घ्याल. कर्म फळ देणारा शनि गुरूच्या मीन राशीला मिश्र फळ देणार असून सर्व बाजूने सांभाळून असावे. परदेशगमन, स्थानाबदल होईल. आर्थिक,शारीरिक,मानसिक अस्थिरता निर्माण होईल. गुरू महाराज  तुम्हाला त्यातून  निभावून नेतील. साडेसाती मध्ये कायदा पाळा, आरोग्य जपा. शनि उपासना करणे योग्य राहील. हे वर्ष मिश्र फळ देईल.
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या