मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /दैनंदिन राशीभविष्य: अमावास्या आणि सूर्यग्रहण, तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

दैनंदिन राशीभविष्य: अमावास्या आणि सूर्यग्रहण, तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

गुरुवार दिनांक 10 जुन 2021 वैशाख अमावास्या. शनैश्वर जयंती. ही अमावास्या भावुका अमावास्या म्हणुन ओळखली जाते. त्यात आज सूर्यग्रहण आहे. वाचा कुठल्या राशीला अमावास्या बाधक 12 राशींचं भविष्य...

    आज गुरुवार दिनांक 10 जून 2021 वैशाख अमावास्या. शनैश्वर जयंती. ही अमावास्या  भावुका अमावास्या म्हणुन ओळखली जाते. आज  सूर्यग्रहण आहे, पण भारतात  ते दिसणार  नाही  त्यामुळे  वेध पाळण्याची गरज नाही.

    आजचे  राशी भविष्य

    मेष

    ग्रहण  व अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सांभाळून राहण्याची गरज आहे. पैशाचा  अपव्यय  नको, दान करावे. संध्याकाळी मारुती स्तोत्र  म्हणावे.

    वृषभ

    राशीत होणारे  ग्रहण, अमावास्या  मनाला संभ्रमात टाकणारे आहे. आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. सायंकाळी  शनी जप, दान करावे.

    मिथुन

    व्ययस्थानातील ग्रहस्थिती  सूर्यग्रहणाचा  प्रभाव आज  अडचणी निर्माण करेल. आर्थिक,शारीरिक कष्ट  होतील. सायंकाळी  शनी जप व दान करावे .

    कर्क

    आजचे  ग्रहण राशीला  फारसे त्रासदायक  नाही  दिवस  सर्व साधारण आहे. फार  मोठी काम आज  टाळावी.सायंकाळी  उपासना, जप करावा.

    सिंह

    कामाच्या ठिकाणी  सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. वाहन जपुन चालवा. राशि स्वामी  सुर्य ग्रहण योगात आहे. सूर्याचा  जप करावा. दान करावे. ओम शांती.

    कन्या

    ग्रहणाचा परिणाम फारसा होणार नाही. तरीही अमावास्या काळात  काळजी घ्यावी. गुरू जप करावा.  मुलांचे निर्णय उद्या नंतर  घ्यावे.

    तुला

    राशी स्वामी शुक्र दशम स्थानात मंगळा बरोबर  आहे. वादविवाद  नको. शांत राहुन आपले कर्म करावे. अष्टमात होणारे  ग्रहण शुभ नाही. दान व  मारुती स्तोत्र पाठ करावा.

    वृश्चिक

    आज  'असावे सावध मना ' असे ग्रह सांगतात आहे. जोडीदाराला दुखावून  चालणार नाही. वादविवाद होतील. सांभाळून घ्या. आर्थिक बाजू ठीक राहील.

    धनु

    आरोग्य  जपा .अमावास्या  काळात  गुरू जप करा. आज  दिवस शांततेत घालवा. सायंकाळी शनी स्तोत्र वाचले  तर फायदा होईल.

    मकर

    आज मुलांची काळजी घ्या. जोडीदार नाराज होणार  नाही  असे बघा. आज राशी स्वामी  शनी जयंती आहे तेव्हा  शनी आराधना करा.

    कुंभ

    आज गृहकलह होऊ देऊ नका. घरात शांतता रहावी म्हणुन विशेष प्रयत्‍न करा. गुरु महाराज  मदत करतील. पण सायंकाळी शनी स्तोत्र वाचणे योग्य.

    मीन

    व्यय स्थानातील गुरू .तृतीय स्थानात होणारे  ग्रहण  ,अमावास्या सर्व दृष्टीनी सांभाळुन असावे असे सुचवते आहे. गुरु जप करणे फायद्याचे आहे.

    आज करण्याचे दान _काळे उडीद  तेल  मिठ, काळे वस्त्रं ,लोखंडी  वस्तु

    जप  -ओम शं.शनैशचराय नम:

    शुभम  भवतु!

    First published:

    Tags: Rashibhavishya