Home /News /astrology /

Horoscope : मकर, कुंभसाठी शुभ आहे आजचा दिवस; तुमचं भविष्य पाहिलं का?

Horoscope : मकर, कुंभसाठी शुभ आहे आजचा दिवस; तुमचं भविष्य पाहिलं का?

आज सोमवार दिनांक 5 जुलै. आज योगिनी एकादशी आहे. आज चंद्र संध्याकाळ पर्यंत मेष राशीत राहणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शनि ग्रहा बद्दल.

आज सोमवार दिनांक 5 जुलै. आज योगिनी एकादशी आहे. आज चंद्र संध्याकाळ पर्यंत मेष राशीत राहणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शनि ग्रहा बद्दल. ग्रह मालेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि महा बलाढय़ असा हा ग्रह आहे. साक्षात प्रारब्ध म्हणजे शनि देव. तुमच्या कुंडली मध्ये त्याची स्थिती ही कर्मा वरून ठरते. सूर्य पुत्र शनि वरून साडेसाती  आणि अष्टम शनिचा विचार होतो. ज्या स्थानात असतो त्याची वृद्धी करतो  व जेथे दृष्टी असते तेथे नाश करतो. तुला राशीत उच्च, न्यायाधीश असतो. तर मकर आणि कुंभ राशीत स्वगृही ,उच्च अवस्थेत फळ देतो. मेष ही शनीची नीच रास असते. शनि दाता आहे. शनिचा रंग काळा, पंगू, व रत्न नीलम आहे. तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळे तो देतो. शनी प्रधान व्यक्ती चिकाटीच्या, न्यायी आणि समतोल बुद्धीच्या असतात. तर नीच अवस्थेत विचित्र मानसिकता, मोठे रोग हाडांचे, स्नायूंचे विकार, अणि भय असे फळ देतो. खूप कष्ट देऊन मग यश देतो. मुख्यत्वे  तांत्रिक, कष्टाचे, आणि दीर्घ असे कार्यक्षेत्र असते. शनि ग्रह अहंकार धरेल त्यास शासन करतो. शनीची उपासना करणे, दान व जप करणे योग्य. ओम शं.शनैशचराय नम: हा शनिचा जप करावा. आजचे बारा राशींचे भविष्य.. मेष आज दिवस समाधानात व शांततेत घालवा. राशीतील चंद्र आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक स्थितीत सुधार होणार आहे. दिवस शुभ आहे. वृषभ आज खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. कुटुंबासाठी काहीतरी विशेष खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. काम पडले तरी फळ मिळेल. दिवस मध्यम. मिथुन आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहाल. लाभ होतील. राशीतील सूर्य अधिकार वाढ करेल. धनस्थानातील शुक्र कुटुंबासाठी खर्च करायला लावेल. दिवस शुभ आहे. कर्क राशीतील मंगळ शुक्र तुमच्यात एक प्रकारचा  रुबाब निर्माण करतील. लोकांवर तुमचा उत्तम प्रभाव पडेल. हाती घेतलेली कामे नीट पार पडतील. नोकरीमध्ये वरिष्ठ खुश राहतील. सिंह आज भाग्य साथ देणार आहे. मोठ्या जबाबदारीने तुम्ही काम पूर्ण कराल. व्ययस्थानातील मंगळ थोडा खर्च करेल. चिकाटी आणि परिश्रम वाढणार आहेत. दिवस शुभ. कन्या आर्थिक बाजु भक्कम असली तरी कुठेतरी  अशांती, हुरहुर वाटेल. चिंता करू नका  लवकरच चांगले क्षण येतील. दिवस फार काही अपेक्षा न ठेवून शांत पणे घालवा. तुला भागीदारी,व्यावसायिक निर्णय, आणि जोडीदाराचा योग्य सल्ला असा आजचा दिवस आहे.  तुमची हुशारी कामे  सुरळीत मार्गी लावेल .भाग्य साथ देईल. दिवस चांगला आहे वृश्चिक आज फार मोठे निर्णय किंवा आर्थिक देणेघेणे टाळा. डोळ्याचे त्रास असतील तर लक्ष द्या. कोणाशीही  वाद नको. मात्र तुमचे  सहकारी साथ देतील. दिवस  मध्यम आहे. धनु द्वितीयात शनि अणि पंचमात चंद्र संततीचे प्रश्न निर्माण करतील. आर्थिक स्थिती सांभाळा. स्त्रियांना काही प्रकृतीच्या तक्रारी असतील तर लक्ष द्या. गुरू बळ आहे. दिवस बरा जाईल. मकर आज घरगुती प्रश्न डोक वर काढतील. कोणाचे आजारपण, कोणाची मदत करावी लागेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला आहे. कुंभ आज  प्रवास  ,मौजमजेसाठी खर्च, आणि एखाद्या विशिष्ट कामासाठी महत्त्वाचा फोन असा दिवस आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी बाहेर पडाल. दिवस शुभ. मीन आर्थिक प्राप्ती झाली,  तर खर्च उभे राहणारच. तेव्हा चिंता नको. मुलाबाळां साठी खर्च होणार आहे. घरासाठी नवीन वस्तु ,काही धार्मिक गोष्टीची पूजेची तयारी असा दिवस आहे. शुभम भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या