आज दिनांक 28 जानेवारी 2022 वार शुक्रवार. आज षटतिला एकादशी. चंद्र आज ज्येष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण आर्थिक बाबीसाठी उत्तम फळ देईल. प्रकृती जपा. आत्मविश्वास कमी होईल.मंगळ शुक्र भाग्योदय करणार आहे. दिवस मध्यम जाईल.
वृषभ
सप्तम चंद्र मानसिक स्थैर्य निर्माण करेल. घरांमध्ये काही विशेष घटना घडू शकतात. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात काम होतील. जोडीदाराची साथ लाभेल. नवीन संधी मिळतील. दिवस शुभ.
मिथुन
आज घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. प्रकृती सांभाळून असा. कामाच्या ठिकाणी, व्यवसाय क्षेत्रात शुभ संकेत. दिवस चांगला आहे.
कर्क
शरीर आज थकलेले राहिल. पंचम चंद्र केतू मानसिक दृष्ट्या कठीण जाईल. खर्च बेताने करा. अति दगदग टाळा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता. शब्द जपून वापरा. दिवस बरा.
सिंह
चतुर्थ चंद्र केतू काही विशेष चिंता निर्माण करेल. घराची काळजी घ्या. परंतु गुरुकृपा आहे. मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस चांगला.
कन्या
राशी स्वामी बुध मकर राशीत शनिसोबत असेल. शनि अस्तंगत आहे. बुद्धीचा नाहक व्यय मार्ग ना सापडणे असे फळ देईल. प्रवासात नुकसान संभवते. भावंडांशी संवाद होईल. दिवस शुभ.
तूळ
आज आर्थिक लाभ संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. शुक्र खर्चात वाढ करणारा आहे. भावंडांची गरज भागवाल. वाणीत गोडवा येईल. कलाकारांना शुभ फळ देईल. मैत्रिणींकडून काही मदत मिळवून देईल. दिवस चांगला जाईल.
वृश्चिक
केतू चंद्र राशी स्थानात आहे. वैराग्य योग होईल. ऑफिसमध्ये नवीन संधी मिळतील. द्वितीय स्थानातील शुक्र लाभ करून देईल. प्रगती संथ गतीने होईल. दिवस शुभ.
धनु
राशीच्या व्यय स्थानातील चंद्र केतू तुम्हाला मानसिक, आर्थिक ताण देईल. प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने मार्ग मोकळे होतील.
दिवस चांगला जाईल.
मकर
लाभ स्थानातील चंद्र केतू तुम्हाला आर्थिक, मानसिक स्थैर्य दर्शवते. मित्रमैत्रिणींना भेटणे शक्य होईल. मात्र जपून रहा. प्रवास सांभाळून करा. मंगळ शुक्र खर्चिक फळ देईल. दिवस उत्तम.
कुंभ
दिवस लाभदायक आहे. जोडीदार मदत करेल. व्यवसाय भरभराट करणार आहे. मंगळ प्रकृतीकडे जरा लक्ष द्या असे सुचवीत आहे. भावंडाची भेट होईल. दिवस शुभ.
मीन
आज ऑफिसमध्ये भरपूर काम करावे लागणार आहे. भाग्यशाली रास घरातल्या शुभ घटनांचा आढावा घ्यावा. गुरूची उपासना करावी. दिवस चांगला.
शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.