Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : खर्च करताना जरा जपून; आर्थिक नुकसानाची शक्यता

दैनंदिन राशिभविष्य : खर्च करताना जरा जपून; आर्थिक नुकसानाची शक्यता

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Horoscope today 26 jaunary 2022 : तुमचा आजचा दिवस कसा जाणार. पाहा तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 26 जानेवारी 2022 बुधवार पौष नवमी. आज भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्त सर्व भारतीयांचे मन:पूर्वक अभिनंदन. आज चंद्र सकाळी 10 नंतर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. चंद्र केतू योग होईल. सूर्य मकर राशीत तर शुक्र आता धनु राशीत मार्गी होईल. पाहूया आजचे बारा राशींचं भविष्य. मेष आज भाग्य स्थानात मंगळ शुक्र कार्यक्षेत्रात मोठी हालचाल निर्माण करेल. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात अग्रेसर राहाल. आर्थिक स्थिती ठीक राहिल. प्रकृती जपून. शत्रू पिडा संभवते. दिवस प्रतिकूल. वृषभ आज भाग्य स्थानातील ग्रह अनुकूल फळ देतील. जोडीदाराची साथ लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. दिवस समाधानात जाईल. मिथुन राशीच्या अष्टम स्थानात होणारे ग्रहांचे भ्रमण प्रकृती चिंता निर्माण करेल. आर्थिक व्यय होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क आज चंद्र पंचम स्थानात असून संततीसाठी विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. दिवस शुभ. सिंह राशीच्या पंचम स्थानातील मंगळ शुक्र आर्थिक घडामोडी घडवून आणतील. तुमचा कुटुंबातील व्यक्तींवर प्रभाव पडेल. षष्ठ सूर्य आज तुम्हाला  नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळवून देईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मध्यम. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानातील मंगळ शत्रुत्व वाढवेल. नातेवाईकांना अंतरावर ठेवा. संतती चिंता वाढेल. त्वचा रोग किंवा  पोटाचे विकार त्रास देतील. मात्र  दिवस चांगला. तुला आज राशीच्या तृतीय स्थानातील शुक्र व गुरू शुभ फळ देतील. घरासाठी नवीन वस्तू, शुभकार्य संभवतात. मात्र आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. दिवस चांगला. वृश्चिक आज चंद्र प्रवास योग आणेल. काही जुने हितसंबंध पुन्हा भेटतील. प्रकृती स्थिर राहिल. भावंडाची गाठभेट होईल. बोलण्यावर ताबा ठेवावा. दिवस चांगला. धनु व्यय स्थानात होणारे चंद्र भ्रमण अशुभ फळ देईल. आर्थिक व्यवहार होतील. पण जरा जपून. परदेशसंबंधी व्यवहार होतील. नवीन खरेदी, कपडे मित्रमैत्रिणींना भेट असा दिवस उत्तम पार पडेल. मकर लाभ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण मिश्र फळ देणार आहे. आर्थिक दृष्टय़ा चांगला काळ. नकारात्मक मानसिकता ठेऊ नका. गुरु उपासना करा. दिवस बरा जाईल. कुंभ दशम स्थानात चंद्रामुळे तुमची मानसिकता बिघडेल. कचेरीमध्ये वेळ जाईल. कायदा पाळा. आरोग्य संभाळा. मंगळ ग्रह अपघात, अग्नीपासून भय दाखवत आहे. दिवस मध्यम जाईल. मीन राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र मित्रमैत्रिणी, ज्येष्ठ व्यक्तीपासून लाभ दर्शवतो. संततीकडे लक्ष ठेवा. जोडीदाराची साथ मिळेल पण वाद नको. दिवस शुभ. शुभम  भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या