मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: या 3 राशीच्या प्रगतीचा दिवस; प्रतिष्ठा वाढणार

राशीभविष्य: या 3 राशीच्या प्रगतीचा दिवस; प्रतिष्ठा वाढणार

आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट2021.आज श्रावण कृष्ण द्वितीया. आज तिसरी मंगळागौर. 3 राशींसाठी आज आहे भाग्याचा दिवस, पाहा तुमची रास आहे का त्यात

आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट2021.आज श्रावण कृष्ण द्वितीया. आज तिसरी मंगळागौर. 3 राशींसाठी आज आहे भाग्याचा दिवस, पाहा तुमची रास आहे का त्यात

आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट2021.आज श्रावण कृष्ण द्वितीया. आज तिसरी मंगळागौर. 3 राशींसाठी आज आहे भाग्याचा दिवस, पाहा तुमची रास आहे का त्यात

  आज मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट2021.आज श्रावण कृष्ण द्वितीया. आज तिसरी  मंगळागौर. आज चंद्र कुंभ राशीत असून गुरू चंद्र योग होईल. पाहूया आजचे राशी भविष्य.

  मेष

  दिवस अत्यंत शुभ असुन ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. आर्थिक, धार्मिक,सामाजिक पातळीवर तुम्ही चमकणार आहात. प्रसिद्धी मिळेल. दिवस उत्तम.

  वृषभ

  आज नेहमीचे काम सुरळीत पार पडेल. जास्त श्रम पडले तरी यश मिळेल. घरांमधे काही जबाबदारी येईल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. दिवस शुभ आहे.

  मिथुन

  राशीच्या भाग्य स्थानात चंद्र गुरू  ,आध्यात्मिक उन्नती साठी मदत करतील. छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु प्राप्त होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस उत्तम.

  कर्क

  आज अष्टमात चंद्र गुरू  सखोल वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये यश देतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. अचानक लाभ होईल. भावंडाची भेट होईल. दिवस  मध्यम.

  सिंह

  या राशीच्या व्यक्तींना हा काळ मान मिळवून देणारा आहे. प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराला उत्तम काळ आहे. नवीन व्यवसाय पूरक घटना घडतील. दिवस चांगला.

  कन्या

  कन्या राशीत प्रवेश केलेला बुध लिखाण वाचन  यात शुभ फळ देईल. बुद्धी चा उत्तम वापर करून यश मिळवा .सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला.

  तुला

  संतती कडुन शुभ वार्ता कळतील. भरभराटीचा दिवस आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका. सामाजिक जबाबदाऱ्या जपून घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस बरा जाईल.

  वृश्चिक

  आज घरात होणार्‍या काही समारंभाची तयारी, आखणी कराल. त्यानिमित्त खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील घोडदौड सुरू राहील. आर्थिक बाजु ठीक राहील. दिवस चांगला जाईल.

  धनु

  छोटे प्रवास, गाठीभेटी, संवाद असा हा दिवस आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरतील. कुटुंब सुख मिळेल. आर्थिक बाजु जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला.

  मकर

  आज आर्थिक व्यवहार, अचानक धनलाभ असा दिवस आहे. मात्र प्रकृती आणि प्रवास या बाबत काळजी घ्या. कुटुंब,वाणी आत्मविश्वास पूर्ण राहील. दिवस चांगला.

  कुंभ

  राशीतील गुरू ,चंद्र सात्विक अनुभव देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. घरातील शांतता भंग होऊ नये म्हणुन सजग रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. दिवस शुभ.

  मीन

  धार्मिक समारंभ, नातेवाईकांच्या गाठी भेटी, त्यानिमित्ताने खर्च, देणेघेणे पार पडेल. प्रकृती जपा. आर्थिक बाजु ठीक राहील. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम जाईल.

  शुभम भवतु!!

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya