आज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशीचे (Sagittarius) भविष्य.
मेष
आज चंद्राचे नवम स्थानातील भ्रमण धार्मिक बाबी साठी उत्तम फळ देईल. आत्मविश्वास वाढेल. शुक्र भाग्योदय करणार आहे. दिवस शुभ.
वृषभ
अष्टमात चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. घरांमधे काही विशेष घटना घडू शकतात. खर्च वाढेल. कार्य क्षेत्रात काम होतील. नवीन संधी मिळतील.
मिथुन
आज जोडीदारासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. प्रकृती सांभाळून असा. कामाच्या ठिकाणी, व्यवसाय क्षेत्रात शुभ संकेत. दिवस चांगला आहे.
कर्क
शरीर आज थकलेले राहील .षष्ठ चंद्र शुक्र मानसिक दृष्ट्या कठीण जाईल. खर्च बेताने करा अति दगदग टाळा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता. शब्द जपून वापरा. दिवस बरा.
सिंह
पंचमात मंगळ काही विशेष चिंता निर्माण करेल. मुलांची काळजी घ्या. परंतु गुरुकृपा आहे. मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस चांगला.
कन्या
राशी स्वामी बुध धन स्थानात मंगळ ग्रहाच्या सोबत असेल. बुद्धीचा नाहक व्यय मार्ग ना सापडणे असे फळ देईल.चोरी किंवा नुकसान संभवते. वास्तू किंवा वाहन यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे.
तुला
आज छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु सांभाळा. शुक्र खर्चात वाढ करणारा आहे. वाणीत गोडवा येईल. मैत्रिणींकडुन काही मदत मिळवून देईल. दिवस शुभ.
वृश्चिक
मंगळ व्ययस्थानात आहे नुकसान होईल. ऑफिसमध्ये शत्रू डोक वर काढतील. काळजी घ्या. मात्र धन स्थानातील शुक्र चंद्र लाभ करून देईल. प्रगती संथ गतीने होईल. दिवस शुभ.
धनु
राशीतील चंद्र तुम्हाला आनंदी ठेवेल. भाग्यशाली रास आहे. प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने मार्ग मोकळे होतील.
दिवस चांगला जाईल.
मकर
व्यय स्थानातील चंद्र आज तुम्हाला आर्थिक ,मानसिक ताण दर्शवतो. जपून रहा प्रवास सांभाळून करा. दिवस मध्यम.
शनि उपासना करावी.
कुंभ
दिवस लाभदायक आहे. जोडीदार मदत करेल. व्यवसाय भरभराट करणार आहे.मंगळ बुध प्रकृती कडे जरा लक्ष द्या असे सुचवीत आहेत. भावंडाची भेट होईल .दिवस शुभ.
मीन
आज ऑफिस मध्ये भरपूर काम करावे लागणार आहे. आणि घरातल्या प्रत्येकाचा विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. गुरूची उपासना करावी. दिवस चांगला.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.