Home /News /astrology /

Daily Horoscope : जास्त दगदग टाळा, नको असलेली काम गळ्यात येण्याची शक्यता

Daily Horoscope : जास्त दगदग टाळा, नको असलेली काम गळ्यात येण्याची शक्यता

दिनांक ९ मे २०२२. सोम वार. आज वैशाख शुक्ल अष्टमी. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरू सोबत नवं पंचम योग करील पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक ९ मे २०२२. सोम वार. आज वैशाख शुक्ल अष्टमी. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरू सोबत नवं पंचम योग करील पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष संथ व साधा दिवस. मन थोडे उद्विग्न राहील. चतुर्थ चंद्र आहे. ईश्वरी उपासना बळ व यश देईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. कार्य क्षेत्रात विशेष लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम. वृषभ आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करीत आहे. मन थोडे नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळशनि धार्मिक आस्था वाढेल असे सुचवीत आहेत. दिवस बरा आहे. मिथुन आज शरीर शिथिल वाटेल. जास्त दगदग टाळा. नको असलेली काम गळ्यात येतील. मानसिक ताण येईल. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम. कर्क आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगल मय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम . सिंह आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल. दिवस आनंदात पर पडेल. कन्या तुमच्यापुढे आज प्रवास,भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. भावंडं भेट होईल. दिवस आनंदी आहे. तुला आज चंद्र आणि गुरू नवं पंचम योग आहे. आर्थिक भरभराट होईल. घरात आनंदी वातावरण राहिलं. प्रकृती देखील उत्तम राहिलं. दिवस शुभ आहे. वृश्चिक आज भाग्य  स्थानात चंद्र तणावमुक्त करेल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस चांगला आहे. धनु आज आठवा चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीच्या तृतीयात मंगळ शनि आहे. क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा. मकर आज दिवस लाभदायक असून तुमच्या साठी अनेक संधी घेऊन येईल. राशीतील शनि प्रवास योग आणेल. आईवडिलांची भेट होईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम . कुंभ आज दिवस कार्य क्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. दिवस उत्तम. मीन आज भाग्यदायक आणि आनंदी दिवस आहे. सगळीकडून सुसंधी ,लाभ,प्रवास भेटीगाठी ,यात दिवस आनंदात निघून जाईल. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या