मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : या आठवड्यात मिळू शकतं प्रमोशन, मात्र...; कसा जाईल आठवडा?

Weekly Horoscope : या आठवड्यात मिळू शकतं प्रमोशन, मात्र...; कसा जाईल आठवडा?

आज दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार. तिथी चैत्र कृष्ण प्रतिपदा.या सप्ताहात चंद्र सुरवातीला तुला राशीत असेल. कुंभ राशीत मंगल, शुक्रसोबत असेल. तर सूर्य बुध मेष राशीत अश्विनी नक्षत्रात असेल. गुरू मीन राशीत भ्रमण करेल. राहू व केतू अनुक्रमे मेष व तुला राशीत असतील. या आठवड्यात संकष्टी अंगारकी चतुर्थी आहे. मराठी नववर्ष आपणा सर्वांना मंगल शुभकारक जावो ही सदिच्छा..पाहूया या सप्ताहाचे राशी भविष्य.

पुढे वाचा ...
  • Published by:  Meenal Gangurde
आज दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार. तिथी चैत्र कृष्ण प्रतिपदा.या सप्ताहात चंद्र सुरवातीला तुला राशीत असेल. कुंभ राशीत मंगल, शुक्रसोबत असेल. तर सूर्य बुध मेष राशीत अश्विनी नक्षत्रात असेल. गुरू मीन राशीत भ्रमण करेल. राहू व केतू अनुक्रमे मेष व तुला राशीत असतील. या आठवड्यात संकष्टी अंगारकी चतुर्थी आहे. मराठी नववर्ष आपणा सर्वांना मंगल शुभकारक जावो ही सदिच्छा..पाहूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष राशी स्वामी मंगळ शुक्र योग होणार असून सर्व तऱ्हेने काळजी घ्यावी. पूर्वार्धात चंद्र शुभ फल देईल.कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आठवडा आहे. राशीतील राहू मन भ्रमित करेल. जोडीदाराशी गैरसमज होण्याचे योग आहेत. गुरू लाभाचे, संततीप्रप्तीचे योग बनवेल. आरोग्य सांभाळावे. आर्थिक घडामोडी होतील. सप्ताह चांगला. वृषभ लाभातील गुरू शुभ फल घेऊन येणार आहे. अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे. व्यय राहू आणि केतू आरोग्य सांभाळा, असे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहामुळे काही पूजा वगैरे होतील. रवि बुध अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देतील. प्रकृती जपून रहा. सप्ताह आनंदात जाईल. मिथुन राशी स्वामी बुध लाभ स्थानात रवि सोबत आहे. अधिकार प्राप्ती, प्रमोशन, अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू मंगळ शुक्र आर्थिक लाभ घडवतील. मात्र प्रकृतीची तक्रार सुरू राहील. शुक्र गुरू नवीन आनंदाच्या संधी मिळवून देतील. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात गुरू असून तुम्हाला अधिकारी वर्ग मदत करेल प्रमोशनचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदार साठी फारसा अनुकूल काळ नाही. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणे योग्य राहील. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल उत्तम असल्यामुळे अडचणी निवारण होतील. मंगळाचा आठव्या स्थानात प्रवेश होणार आहे. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवि भाग्यात बुधासोबत असून धर्मा संबंधी शुभ फळ देतील. सप्तमात येणारा शुक्र कुटुंबात आनंदीआनंद पसरवेल. शनि काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असे सुचवत आहेत. नातेवाईकांना भेटण्यासाठी संधी येईल. राहू मन शांत ठेवेल. आठवडा आर्थिक लाभाचा ठरेल. कन्या राशी स्वामी बुध रवि बरोबर जोडीदाराची भरभराट होईल. त्यांना अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता सतावेल. गुरू महाराज शुभ फल देतील. मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू विचित्र काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. शत्रू पिडा होईल. सप्ताह मध्यम जाईल. तुला राशी स्वामी शुक्र मंगळ पंचम स्थानात प्रवेश असून  शुभ योग करेल. तिथेच येणारा मंगळ संतती साठी उत्तम काळ. घर आणि वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित जुळून येतील. रवि बुध नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक दृष्ट्या बरा काळ. मन अस्वस्थ राहील. सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळशूक्रा सोबत युती करणार असून पुढील काही दिवस जपून राहण्याचे आहेत. चतुर्थ स्थानात शुक्र घर आणि वाहन या संबंधी शुभ सूचना देइल. संतती कडे लक्ष द्या. त्यांना उत्तम काळ आहे. मधल्या काळात काही समस्या निर्माण होतील. आठवडा शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरू शूक्रा सोबत येणारा  मंगळ दूरचे प्रवास योग आणेल. भावंडाना शुभ फळ देईल. महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील. ह्या काळात काही नवीन सुरवात करू नका. सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिक दृष्ट्या भक्कम राहील. मकर राशीत होणारा शनि सूर्य केंद्र योग अनेक नवीन संधी मिळवून देईल. मात्र सावध रहा. फसवणूक नुकसान होऊ शकते. भावंडाना अधिकार योग येतील. संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्र प्राप्तीचे नवीन मार्ग खुले करेल. ह्या काळात उपासना, शिधा दान करा. आनंदात सप्ताह जाईल. कुंभ व्यय स्थानातील शनि ग्रह आर्थिक नुकसान, शारीरिक कष्ट दाखवीत आहे. मात्र रवि बुध नवीन प्राप्तीचे मार्ग बनवतील. बोलण्यामध्ये  गोडवा येईल. राशीच्या धन स्थानातील गुरू अतिशय शुभ असून कला गुण वर येतील. नवीन निर्मिती कराल. जपून राहावे. प्रकृती नाजूक राहील. सप्ताह मध्यम जाईल. मीन गुरू महाराज राशी स्थानात आहेत खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची चिंता दूर राहील. राशी धांस्थनातील रवि बुध अधिकार प्राप्ती करून देतील. अचानक अर्थ प्राप्ती होईल..नवे वर्ष आनंदात साजरा कराल. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या