मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly horoscope : वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतील, मात्र कसा असेल आठवडा?

Weekly horoscope : वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतील, मात्र कसा असेल आठवडा?

आज दिनांक १० एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र शुक्ल नवमी. श्रीरामनवमी. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभूंचा जन्म. आज दुपारी १२ वाजता रामजन्म सर्व भारतीय अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. सर्वांना ह्या पवित्र दिवसाच्या मंगल शुभ कामना. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. या सप्ताहात रवि बुध मीन राशीत तर मंगळ शुक्र गुरू कुंभ राशीत आहेत.

आज दिनांक १० एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र शुक्ल नवमी. श्रीरामनवमी. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभूंचा जन्म. आज दुपारी १२ वाजता रामजन्म सर्व भारतीय अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. सर्वांना ह्या पवित्र दिवसाच्या मंगल शुभ कामना. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. या सप्ताहात रवि बुध मीन राशीत तर मंगळ शुक्र गुरू कुंभ राशीत आहेत.

आज दिनांक १० एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र शुक्ल नवमी. श्रीरामनवमी. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभूंचा जन्म. आज दुपारी १२ वाजता रामजन्म सर्व भारतीय अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. सर्वांना ह्या पवित्र दिवसाच्या मंगल शुभ कामना. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. या सप्ताहात रवि बुध मीन राशीत तर मंगळ शुक्र गुरू कुंभ राशीत आहेत.

पुढे वाचा ...
    आज दिनांक १० एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र शुक्ल नवमी. श्रीरामनवमी. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभूंचा जन्म. आज दुपारी १२ वाजता रामजन्म सर्व भारतीय अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. सर्वांना ह्या पवित्र दिवसाच्या मंगल शुभ कामना. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. या सप्ताहात रवि बुध मीन राशीत तर मंगळ शुक्र गुरू कुंभ राशीत आहेत. शनि मकरेत आणि राहू केतू मेष आणि तुला राशीत आहेत.या आठवड्यात बुध राशी बदल करणार असून १२ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. तिथे तो राहू सोबत असेल. या सप्ताहात सर्वात मोठी घटना म्हणजे गुरू स्वतःच्या उच्च मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावर एक स्वतंत्र लेख लौकरच येईल. या सर्व ग्रहस्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य. मेष राशीच्या लाभ स्थानातील ग्रह धार्मिक बाजू भक्कम तर अनेक मार्गांनी लाभ मिळवून देतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येईल. मित्र आणि नातेवाईक भेट होईल. मेष राशीत येणारा बुध राहू सोबत असल्याने हा काळ स्वतःच्या विचार आणि कृतीवर ताबा ठेवा. वाणी कडवट होऊ देऊ नका. गृह सौख्य, वाहन सुख मिळेल. गुरू व्यय स्थानात येणार आहे. सप्ताह आनंदात घालवा. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्र प्रवास योग आणेल. दूरच्या नातेवाईकांची भेट होईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल. जास्तीचे काम करावे लागेल. व्यय राहू आणि बुध जपून राहण्याचे संकेत देत आहेत. आर्थिक बाजू जपा. वाणीवर ताबा ठेवा. लाभतील गुरू अत्यंत शुभ फळ देईल. हा सप्ताह एकूण गडबडीचा आणि व्यस्त असा जाईल. मिथुन राशीच्या धन स्थानातील चंद्र आणि राम नवमीचा सुयोग आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. शनि आठवा असला तरी आता तो कुंभेकडे निघाला आहे. फारशी भीती बाळगू नका. गुरू आणि बुधाच्या गोचर सर्व अर्थाने लाभदायक ठरेल. सप्ताह आनंदात जाईल . कर्क राशीतील चंद्र शनुशी प्रतियोग करणार असून माता, गृह यासाठी थोडा अधिक नकारात्मक प्रभाव देईल. मन आशांकित होईल. आनंदाची बातमी म्हणजे या सप्ताहात होणारे मीन राशीतील गुरू  भ्रमण आयुष्यात नवीन आनंदाच्या पर्वाची सर्वात करेल. भाग्यात येणारा गुरू हा एक अत्यंत मोठा योग येणार आहे. सप्ताह आनंदात घालवा. सिंह हा सप्ताह अनेक नवीन घटनांची सुरुवात करणारा आहे. बुध आणि राहू भाग्य स्थानात धार्मिक आस्था निर्माण करतील. गुरू मात्र सिंह राशीचा आठवा होणार असून हे वर्ष मंगल करू, संतती यासाठी अनुकूल नाही. शनि देखील आता कुंभेत जाणार आहे. जपून रहा असा संकेत देणारा हा सप्ताह आहे. कन्या गेलं वर्षभर सहावा गुरू आणि पंचम शनि यांनी त्रस्त झालेल्या कन्या व्यक्ती आता सुटकेचा श्वास सोडतील. सप्तम स्थानात गुरू भ्रमण अतिशय शुभ, व्यवसाय वृद्धी, आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. अविवाहित व्यक्तींना लौकरच चांगले प्रस्ताव येऊ लागतील. लाभ, प्रवास, धर्म सर्व बाबतीत सप्ताह शुभ आहे. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. प्रकृती जपा. तुला बुध राहू वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण करतील. जोडीदाराच्या नातेवाईक मंडळींची भेट होईल. षष्ठ स्थानात प्रवेश करणार गुरू नोकरी, मामा पक्ष इत्यादी साठी शुभ. कर्ज उतरेल. रोग बरे होतील. उच्च गुरू अध्यात्मिक अनुभव देईल. पंचम मंगळ शुक्र शुभ आहेत. संतती प्राप्ती होईल. सप्ताह शुभ. वृश्चिक पंचम स्थानात येणारा गुरू संतती, उच्च शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, धार्मिक आस्था यासाठी अतिशय उत्तम फळ देणार आहे. शष्ठ बुध राहू शत्रू नाश करतील. बुद्धी विपरीत दिशेने चालेल. जपून असा. धार्मिक स्थानांचे प्रवास होतील. भाग्यातील चंद्र पूर्वार्धात शुभ फळ देईल. सप्ताह उत्तम. धनु राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार गुरू नवीन घर, वाहन मिळवून देईल. घरामध्ये काही विशेष दुरुस्ती मंगळ कार्य देखील होईल. पंचम बुध राहू बुद्धी काहीशी भ्रमित करेल. तृतीय मंगळ शुक्र कला, प्रवास, भावंडांशी संवाद यात मदत करेल. पूर्वार्धात चंद्र भ्रमण अनुकूल नाही. प्रकृतीची काळजी घ्या. सप्ताह मिश्र फळ देईल . मकर राशी स्वामी शनी आता पुढील राशीत जाण्यास तयार आहे. मकर व्यक्ती आता सुटकेचा श्वास घेतील. उच्च गुरू विदेश प्रवास धार्मिक ठिकाणांना भेट यासाठी अनुकूल आहे. मंगळ आर्थिक हानी करील. मात्र अनेक ठिकाणाहून प्राप्ती, उत्तम वस्तूंची खरेदी देखील कराल. सप्ताह उत्तम फळ देणारा ठरेल. कुंभ राशीतून पुढे जाणारा गुरू अतिशय उत्तम आर्थिक प्राप्ती करून देईल. वडिलार्जित धन, वस्तू, लाभ होईल. कुटुंब सुख लाभेल. सध्या स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाणी लाभेल. त्याचा योग्य उपयोग करा. सुरुवातीला प्रकृतीचे बारीक सारीक त्रास संभवतात. सप्ताह शुभ. मीन राशीत प्रवेश करणार गुरू मीन व्यक्तींना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. आर्थिक, सामाजिक पातळीवर उच्च फळ देईल. मात्र  लौकरच  राशीला साडेसाती सुरू होणार आहे.तिकडे लक्ष असू द्या.संतती साठी उत्तम फळ देणारा पूर्वार्ध आहे .मंगळ शुक्र आकर्षक व्यक्तीचा सहवास मिळवून देतील.सप्ताह शुभ फळ देईल . शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या