Home /News /astrology /

Daily Horoscope : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिस पॉलिटिक्सचा करावा लागू शकतो सामना

Daily Horoscope : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिस पॉलिटिक्सचा करावा लागू शकतो सामना

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

जाणून घ्या कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस...

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 9 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) – तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी कदाचित तुम्हाला पुन्हा त्रासदायक ठरतील. तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना घर करू शकते. तुम्ही आता नवीन बाँड्स आणि रिलेशनशीप तयार करण्याचा प्रयत्न करू शकता. LUCKY SIGN - डायमंड रिंग (Diamond Ring) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) किंचित मिसकॅल्युलेशनमुळे तुमचे सगळे प्रयत्न वाया जाऊ शकतात. सूचना देताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला थ्रिलिंग न्यूज मिळू शकते. LUCKY SIGN - मस्टर्ड कुशन (Mustard Cushions) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमचं संपूर्ण कुटुंब खूप दिवसांनी एकत्र येईल. त्यामुळे तुम्ही या एकत्र येण्याचा आनंद साजरा केला पाहिजे. प्रवास करताना थोडासा उशीर होऊन अस्वस्थता जाणवू शकते. तुम्ही अधिक खंबीर होण्याची गरज आहे. LUCKY SIGN - सिल्क स्कार्फ (Silk Scarf) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) असे काही क्षण आहेत जे तुम्हाला कायम तुमच्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे आहेत. सध्याचा क्षण हा त्यापैकी एक आहे. नवीन जर्नीची तयारी करा. नोकरी किंवा कामाच्या जागेमध्ये बदल होऊ शकतो. LUCKY SIGN - बर्ड केज (Bird Cage) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्यासारखा माईंडसेट असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुमची भेट होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही महत्त्वाच्या आणि रिलेव्हंट गोष्टी स्वतःकडे ठेवायला शिकलं पाहिजे. एखाद्या चांगल्या व्यक्तीची सोबत मिळाल्यास तुम्हाला फरक जाणवेल. LUCKY SIGN - ग्रॅनाईट स्टोन (Granite Stone) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही एखाद्याला सहानुभूती दाखवल्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते. तुमच्या भल्यासाठी प्रयत्न करणार्‍या व्यक्तीशी तुम्ही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तुमच्या आवडीनिवडी जोपासल्यास तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. LUCKY SIGN - क्रिस्टल जार (Crystal Jar) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) जर तुम्ही एखाद्याचा विश्वास गमावला असेल तर फक्त माफी मागून चालणार नाही. त्याला कृतीची जोड दिली तरच विश्वास परत संपादन करता येईल. कुणीतरी तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत आहे. त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. LUCKY SIGN - कास्ट आयर्न (Cast Iron) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादी नवीन मॅच्युअर व्यक्ती आकर्षक वाटू शकते. परंतु, त्यात तुमची फसवणूक होऊ शकते. कुठल्याही डॉक्युमेंट्सवर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचण्यास शिकलं पाहिजे. सिंगिंग फिल्डमधील व्यक्तींना चांगला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - सिल्व्हर ज्वेलरी (Silver Jewelry) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्यापैकी बहुतेकांचा दिवस जेमतेम असेल. ज्यामध्ये फारसं काही साध्य होणार नाही. पण, ही स्थिती म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वीचा थोडासा ब्रेक असू शकतो. बऱ्याच काळानंतर काहीतरी वाचणं, फायद्याचं ठरू शकतं. LUCKY SIGN - मनी प्लाँट (Money plant) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) जर तुम्ही एखाद्या व्यक्तीमागे किंवा ध्येयामागे धावत असाल तर आता कदाचित ते तुमची दखल घेतील. आता त्यांच्यामागे वेळ वाया घालवल्यात काहीही अर्थ नाही. तुमचा आतला आवाज तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. LUCKY SIGN - सिलिकॉन मोल्ड (Silicone Mold) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) जर एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर तिला खूश करण्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या आसपास असलेल्या काही इंट्रेस्टिंग लोकांना तुमचं सर्व अटेंशन मिळू शकतं. सध्या तुम्हाला तुमचं उद्दिष्ट काहीसं अस्पष्ट वाटू शकतं परंतु, लवकरच ते अधिक स्पष्ट होईल. LUCKY SIGN - मधमाशी (Honeybee) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नफा आणि तोट्याची परिस्थिती वर्क रिलेशनशीपमध्ये अडथळा निर्माण करू शकते. तुम्हाला दोन्हीपैकी एका बाजूची निवड करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तुमचा जोडीदार काहीतरी महत्त्वाची बाब तुमच्यासोबत शेअर करू शकतो. तुमचा डिमांडिंग अॅटिट्युड समोरच्या व्यक्तीला नाराज करू शकतो. LUCKY SIGN - पिरॅमिड (Pyramid)
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या