Home /News /astrology /

Daily Horoscope : आर्थिक आणि मानसिक त्रास संभवतात, अडचणींचा दिवस!

Daily Horoscope : आर्थिक आणि मानसिक त्रास संभवतात, अडचणींचा दिवस!

दिनांक ८ मे २०२२ सोमवार. आज वैशाख शुक्ल सप्तमी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक ८ मे २०२२ सोमवार. आज वैशाख शुक्ल सप्तमी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष चतुर्थ स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून आई वडील भेट, घरात काही विशेष घटना असा हा दिवस आहे. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम. वृषभ आज तृतीय चंद्र  मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. मन आनंदी राहिलं. दिवस उत्तम. मिथुन राशीच्या धन स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहील. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. कर्क आज  राशी स्थानातून  होणारे चंद्र भ्रमण गृहसौख्य देणारे आहे. अष्टम शनि मंगळ कुरबुरी सुरू ठेवेल. रवि बुध मात्र मार्ग दाखवतील. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक व्यय दाखवित आहे. त्रासदायक दिवस. प्रत्येक विषयात काही तरी अडचण निर्माण होईल.शांत रहा. दिवस मध्यम. कन्या आज लाभ स्थानातील चंद्रभ्रमण उत्तम असून घरासाठी काही विशेष खरेदी होईल . जास्तीचे काम पडेल.  वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे. तुला कामाच्या ठिकाणी काही महत्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील. दिवस बरा आहे. वृश्चिक भाग्य स्थानातील चंद्र मध्यम अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठीक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहील. दिवस चांगला आहे.. धनु आज चंद्र भ्रमण आणि तृतीय शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनपासून जपा. आर्थिक दृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम. मकर आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ आज संतती साठी त्रास दायक दिवस राहणार आहे. मंगळ राशीत असून प्रकृती नाजूक, आर्थिक दृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल. मीन आज कार्य क्षेत्र आणि घरेलु जीवन याला महत्व असेल. प्रवास योग येतील. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या