मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या अन् वाहन जपून चालवा!

Daily Horoscope : वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या अन् वाहन जपून चालवा!

आज दिनांक  ४ एप्रिल २०२२. वार सोमवार. आज आहे चैत्र शुक्ल तृतीया. गौरी तृतीया. आज चंद्र मेष राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक ४ एप्रिल २०२२. वार सोमवार. आज आहे चैत्र शुक्ल तृतीया. गौरी तृतीया. आज चंद्र मेष राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक ४ एप्रिल २०२२. वार सोमवार. आज आहे चैत्र शुक्ल तृतीया. गौरी तृतीया. आज चंद्र मेष राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Meenal Gangurde
आज दिनांक  ४ एप्रिल २०२२. वार सोमवार. आज आहे चैत्र शुक्ल तृतीया. गौरी तृतीया. आज चंद्र मेष राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या दशमस्थनातील शनि मंगळ युती ही कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटना घडवून आणेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दिवस मध्यम. वृषभ भाग्य स्थानात आलेला मंगळ शनी त्रस्त करेल. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. व्यय चंद्र खर्चात वाढ करेल. अतिशय जपून असा. दिवस कठीण. मिथुन मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी प्रकृतीची अतिशय काळजी घ्यावी. गुरू अनुकूल आहे. मात्र शनि उपासना जरूर करा. लाभतील चंद्र शुभ आहे. दिवस बरा. कर्क राशीच्या समोर होणारी शनि मंगळ युती प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. अकस्मात घटना घडतील. दिवस चांगला. सिंह आजचे चंद्रभ्रमण भाग्य स्थानात आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. घराकडे विशेष लक्ष द्या. उत्तम दिवस. कन्या राशीच्या अष्टम स्थानात येणारे चंद्र भ्रमण सावध राहा असे सांगत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अडथळे येतील. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. दिवस मध्यम. तुला गृह कलह, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आई वडिलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. जोडीदार आनंदी राहील. दिवस बरा. वृश्चिक बहीण भावंडं तुमच्यावर नाराज होतील त्यांना काही समस्या येतील. प्रवासात त्रास, नुकसान संभवते. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम. धनु पंचम चंद्र आज शुभ फळ देईल. मात्र धनस्थानात शनि मंगळ आर्थिक दृष्ट्या सांभाळून राहवे असे सांगत आहे. कर्ज घेण्याची वेळ येईल. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा. मकर सर्वार्थाने जपून राहण्याचा काळ आहे. राशीतील शनि मंगळ  कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडण तंटा होऊ नये म्हणून सावध रहा. घरामध्ये वेळ द्या. दिवस मध्यम. कुंभ राशीच्या व्यय स्थानात शनि मंगल म्हणजे दवाखाना, कोर्ट केसेस किंवा सामाजिक जीवनात बदनामी असे योग आणतील. तृतीय चंद्र महत्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम. मीन लाभ स्थानात होणारी शनि मंगळ युती मित्र मैत्रिणी पासुन सावध रहा. संतान चिंता वाटेल. आर्थिक लाभ होतील. जपून राहण्याचा प्रयत्न करा. दिवस शुभ. शुभम भवतू.!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या