Home /News /astrology /

Daily Horoscope : होणाऱ्या खर्चाला आवर घाला, थोडे नकारात्मक वातावरण राहिल!

Daily Horoscope : होणाऱ्या खर्चाला आवर घाला, थोडे नकारात्मक वातावरण राहिल!

दिनांक २ मे २०२२ सोमवार. तिथी वैशाख शुक्ल द्वितीया. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

दिनांक २ मे २०२२ सोमवार. तिथी वैशाख शुक्ल द्वितीया. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज संतती नाराज होऊ शकते.  त्यांना वेळ द्या. शांत रहा. चांगला दिवस . वृषभ आज राशी स्थानात चंद्र भ्रमण आहे, तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ, उत्तम वाचन, नातेवाईक भेट असा हा दिवस उत्तम आहे. मिथुन आज घर आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. दिवस शुभ. कर्क दिवस काही महत्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विषेश काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. मध्यम दिवस आहे. सिंह आज कुठूनतरी प्रवास योग येतील. कुटुंब सुख चांगले असून. शेजाऱ्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. कामात वाढ होईल. दिवस शुभ आहे. कन्या घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. तुला चंद्राचे अष्टम स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम. वृश्चिक मंगळ शनि घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य षष्ठ स्थानात असून संतती चिंता वाढेल. मात्र लाभ होतील. दिवस शुभ. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ. मकर आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. मंगळ शनि आरोग्य समस्या निर्माण करतील. कार्य क्षेत्र गाजवाल. आर्थिक लाभ. दिवस शुभ . कुंभ दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. थोडे नकारात्मक वातावरण राहिल. जोडीदार आनंदी राहील. दिवस शुभ. मीन व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख भरपूर मिळेल. सध्या गुरू शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या